परतून ये ना आई
परतून ये ना आई
वर्ष झाले आहे आई
आज तुला आमच्यातून जाऊन
परतून ये ना आई
तू पुन्हा जन्म घेऊन
तुझी प्रत्येक दिवसाला आई
आठवण मला येत होती
तुझी आठवण आल्यावर आई
डोळ्यातील अश्रू ढाळत होती
आमच्यात होतीस तेव्हा तू
कधीच जाणवली नाहीस मला
आज आमच्यात नसली जरी
तू अजूनही आठवतेस मला
आई तू मला रोज भरवायची
मायने प्रेमाचा हा घास
आज घास भरवल्याचा आई
बघ होतोय मला भास
किती शोधले मी तुला
तरी सापडली नाहीस मला
कुठे आहेस तू आई
आता सांगशील का मला
आई मी तुझे उपकार
कधीच विसरणार नाही
कारण माझ्या आयुष्याचा
एक भाग आहेस तू आई
