बालपण
बालपण
1 min
209
बालपणी काही गोष्टी
आनंदाने करायचो,
दोरा बांधूनी चड्डीला
मी शाळेमध्ये जायचो.||1||
शिकवलेले लक्षात
बसत नव्हते काही,
शाळेमध्ये जाऊन मी
नुसता बसून राही.||2||
शाळा बुडवून आम्ही
ओढ्या काठी फिरायचो,
मित्र घेऊन साथीला
मासे आम्ही धरायचो.||3||
मला अजून वाटते
बालपण ते जगावं,
पुन्हा तेच बालपण
देवाकडेच मागावं. ||4||
उगाच मोठा झालो मी
बरे होते बालपण ,
काही गोष्टी शिकायला
लागत शहाणपण. ||5||