विषय :- सागरी किनारा
विषय :- सागरी किनारा
या सागरी किनारी एकांतात
बसलो उडवीत मी पाणी ,
पाणी उडवत असताना
तुझी आठवण येते राणी ... ||1||
तू सोडून गेल्यावर हा
किनारा माझा मित्र झाला ,
तुझा येता विचार
तो दूर त्याने केला ... ||2||
या किनाऱ्यावरती तुझी
आठवण होती दडलेली ,
इथे आपल्या प्रेमाची
होती घटना घडलेली ... ||3||
वेगळे झालो होतो आपण
आता याच किनाऱ्यावरती ,
वाटतं मला पुन्हा एकत्र
यावे याच किनाऱ्यावरती ... ||4||