Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh sawant

Abstract

4.0  

Mangesh sawant

Abstract

बाप

बाप

1 min
126

राहू दे तुझा आधार 

पाठीवरी तुझी थाप, 

शेतकरी राजा तूच 

झालास आमचा बाप.||१||

निघून गेले आयुष्य

या मातीत राबताना,

हरपून गेले स्वप्न 

आयुष्य हे जगताना.||२||

नको लावून घेऊस 

तूझ्या गळ्याला रे फास,

तुझ्या या मुक्या पिलांना 

तुझी लागेल रे आस.||३||

 राहू दे वेड्या मजला 

आज तुझ्याच साथीला,

राबेल मी शेतामधी 

सांग तू कळ्या मातीला.||४||

जोपर्यंत श्वास आहे

खेळ तू झुंज वैऱ्याशी,

देईन साथ मी तुला

घाव घेईन जीवाशी.||५|| 

काळ्या आईसाठी अश्रू 

तुझ्या डोळ्यातून वाहे, 

ऋणी धरणी आईचा 

माझा शेतकरी आहे.||6||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract