बहीण भावाचं नातं
बहीण भावाचं नातं
ताई तुझ्या प्रेमाचा
कसा होऊ उतराई,
धावलीस तू संकटात
होऊनी मायेची साई. ||1||
करी संकटावरी मात
पेटवूनी समई ज्योती,
बहिण भावाचं नातं
जणू शिंपल्यातले मोती. ||2||
जोडतो रेशमी हा धागा
अतूट नात्याचे बंध,
ओवाळते ताई तू मला
कपाळी लावूनी गंध. ||3||
उदंड आयुष्य लाभो तुला
हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
करितो रक्षण तुझे ताई
हीच खरी माझी भेट ना. ||4||