STORYMIRROR

Mangesh sawant

Classics

3  

Mangesh sawant

Classics

मानवा घे तू उंच भरारी

मानवा घे तू उंच भरारी

1 min
213

स्वप्न साकार होईल

लढूनी त्या वादळाशी,

 ठेव अशी उराशी जिद्द

झुंज खेळूनी संकटाशी ...||1||


नको करू फिकीर कशाची

यश येईल तुझ्या हाती,

खुल्या होतील साऱ्या वाटा

घेऊनी मशाल तू हाती ...||2||


जगण्यास कर आरंभ

शोध नव्याने तू वाट,

कर हे जगणे निर्भीड

असला जरी काळोख दाट ...||3||


निळ्या नभात झेप घेण्या

संकटे दूर होतील सारी,

नाही कशाचे बंधन तुला

मानवा तू घे उंच भरारी ...||4|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics