आई-वडिलांचे कष्ट
आई-वडिलांचे कष्ट
शेतकऱ्यांच्या मुलांनो
मी सांगतो ऐका जरा,
आई वडिलांचे कष्ट
तुम्ही डोळ्या पुढे धरा.||1||
कष्ट करूनी शेतात
केले जीवाचे ते रान,
कोरडे शेत पाहून
उदासलॆ त्यांचॆ मन||2||
शेतात राबल्यावर
मिळे भाकर पोटाला,
उन्हात करून काम
घट्टे पडले हाताला.||3||
काळ्या मातीत पेरून
धान नाही उगवले,
भेगळले शेत माझे
नाही मला बघवले.||4||
कष्ट करता करता
हरवली त्यांची भूक,
शेतकरी माय बाप
काय झाली त्यांची चूक||4|||