STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

प्रणयरंग

प्रणयरंग

1 min
256

प्रणयाच्या खेळाला , रंग चढला भारी

उसळत्या मनाला , आली उभारी

मन तिचे नवे नवे , इमले उभारी

जागेपणीच पाही , स्वप्ने सोनेरी


स्वप्नीचा राजकुमार , आला सामोरी

त्याला न्याहाळताना , ती झाली बावरी

स्वप्नात नित्य त्याला , रोज पाही तरी

संगणकावर पाहताना , सखी झाली गोरीमोरी


प्रपोजल त्याने दिले , तिने मान्य केले

अननुभवी दोघेही , लग्नाचे वचन दिले

मेल फोन चँटिंग करताना , दोन जीव रमले

अनोख्या प्रेमविश्वात , प्रणयाचे रंग बहरले


स्वप्नरंजन करताना , सत्य सामोरी आले

लग्नाच्या बेडीसाठी , दोन जीव अधीरले

प्रेमाच्या पूर्तीसाठी , शुभमंगल ठरले

दोन प्रेमी जीव, जीवनाचे जोडीदार झाले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract