STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

प्रीत तुझी माझी ...

प्रीत तुझी माझी ...

1 min
3.3K


तुझा अबोला मज छळतो ...

तुज स्मितहास्यानं थकवा दूर पळतो

तुझा दुरावा मज साहवेना ..

असून अडचण नसून खोळंबा ...

 प्रीत तुझी माझी  नाही गं जगावेगळी ...

सहजंच तू रुसावं मी मनवावं ...

कधी मी अबोल व्हावं 

अनं तू सैरभैर ...

पुन्हा नव्याने एक्मेकांस शोधावं

प्रीत तुझी माझी  नाही गं जगावेगळी ...

कित्येक पाहीलेत जोडीनं चढउतार 

दुःखांचा डोंगर अनं  प्रेमाची हिरवळ..

तिसरे महायुध्द त्यानंतरचा बिनशर्त तह

विसरलोही हेवेदावे; शह काटशह...

 प्रीत तुझी माझी  नाही गं जगावेगळी ...

सप्तपदीच्या आना भाका पुन्हा नव्याने घेवूया

खोटं खोटं का होईना जग हे सुंदर म्हणूया...

सुरेख बंधनातील नंदनवन समजून...

आयुष्याचा मकरंद  अंतापर्यंत चाखूया...

 प्रीत तुझी माझी  नाही गं जगावेगळी ...

 

                 


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational