प्रेमपत्र
प्रेमपत्र
कशी आहेस तू ?
तू जवळ असल्याचा भास
होतो मला...
अन् दूर गेल्याचं दुःखही....!
खरं सांगू ! तुझ्या हातचं जेवण आता
मिळतच नाही बघ...
भरलेल्या पोटातून कधी ढेकरच येत नाही बघ....!
मांडीवरच्या उशीवर झोप लयी गाढ लागत होती
आज लयी मऊ उशी हाय बघ
पण झोप मात्र येत नव्हती.......!
उपाशी काळीज कधीच ठेवल नाहीस माझं
उकळया फुटल्यागत जीव लावलास गं तू......!
अंगण सारवताना
तोरण लावताना
रांगोळी काढताना
जातं गिरवताना
ओव्या गाताना
तुला कुठं कुठं नाही पाहिली गं
असलीस दूर म्हणून काय झालं
काळजात जन्मभर राहशील गं.......!
तुझ्या धडपडीनच मी सावरलोय आज
तुझ्या बडबडीनच मी घडलोप आज
तुझं अडाणीपणाचं शिक्षण
समाजात जगण्याच शिक्षण देऊन गेलं.....
'आई' तुझ्या उपकराचं ओझं
कणभरही रितं नाही झालं.......!
माया आटली नाही गं तुझी
आयुष्य आटत चाललं
प्रेमपत्र ह्या लेकाचं
संपता संपेना गं आज.........!
