_प्रेमझरा
_प्रेमझरा
प्रेमझरा
तुला बघूनि भान हरपले
तुचं वाटला कृष्ण खरा
हृदयातही नवनीत भरले
वाहू लागला प्रेमझरा..
श्वासा वरती भावं उमटले
क्षणात लागला तुझा लळां
तुझ्यासाठी झोका बनले
जागे केली वसुंधरा..
मला बघता खुदकंन हसला
अवखळ भासली प्रेम त-हा
तुझ्यांच भाळी शोभून दिसला
पोर्णिमेचा तो चंद्र खरा..
स्पर्श रेशमी अवीट होता
गाली फुलल्या पुष्पं कळां
वात्सल्याने स्तनं चाटता
चंदन झाली अवघी जरा..
चोळी वरती नक्षी उमटली
लोचनी रंगल्या प्रित कडा
रजनी संगे मायं झोपली
मुखी उलटूनी दूधं घडा..
