प्रेमाच्या परिसीमा..!
प्रेमाच्या परिसीमा..!
प्रेमाच्या
सीमा परिसीमा...!
अशीच सहज
नजरा नजर झाली
माझी विकेट पडली
तशी तिचीही
विकेट पडली
जेंव्हा एका वळणावर
योगा योगाने
आपसूक भेट घडली
ती दूर
अंतरावर आई सोबत
मी ही दूरच
मित्रांसोबत
कोणालाच काही
कळले नाही
आणि वेगळाच
प्रवास सुरू झाला
तो तसाच वाढत वाढत
वाढला पण थांबला नाही
कारण म्हणावं तस
इच्छित स्थळच लाभलं नाही
मर्यादा मनातच
घर करून होती
ती तशीच राहिली
आणि
त्यागाची भूमिका
पार पाडावी लागली
पण
व्हायचं तेच झालं
प्रेम खुलल, फुलल
आणि खुलतच राहील
फक्त थोडं तिच्या मनात
थोडं माझ्या मनात
इतकंच
पटलं प्रेम
प्रेम असत
बंधना पलीकडे
झेपावणार आणि
हवं तिथं बंधनात सुद्धा
बंधमुक्त होऊन
सदैव फुलत राहणार...!

