प्रेमाचे विश्व 'आई'
प्रेमाचे विश्व 'आई'
आईच्या हृदयात माझी जागा,
परमेश्वरानेे घट्ट बांधला आमुचा धागा
आई माझी नि:शब्द जाग,
तिच्या अंतःकरणाचा मी एक भाग,
आई आपुली नसेेे केवळ काया,
कुशीत तिच्या मिळते गगनभर माया,
आई माझी कष्ट करूनी
घेतेे गगन भरारी,
तिच्या चरणाशी घडे
पंढरीची वारी,
नाव एक 'आई' परमात्म्याचे,
आई गूज अंतरीचे,
प्रेमाचेे विश्व माझी आई,
कौतुक लेकरांचे
मायेच्या ममतेने पाही,
आई माझे झाड प्रेमाचे,
मी अंकुर तिच्या हृदयाचा....
