STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

3  

Umesh Dhaske

Abstract

प्रेम

प्रेम

1 min
330

कानाकोपर्‍यात दडून बसलेलं लफड्याचं प्रेम

हव्यासानं ओतप्रोत भरलेलं फाजील प्रेम


फुगलेल्या खिशावर 

भाळलेलं हट्टी प्रेम

अश्लिलतेच्या स्वाधीन झालेलं निर्लज्ज प्रेम


स्वार्थी मैत्रीच्या पोटातून जन्म 

घेतलेलं दगाबाज प्रेम

अंधाराला कवटाळून मिठी मारणारं काळं प्रेम


कातड्यासाठी आतडं 

पिळणारं प्रेम

खोट्या आणाभाकांच्या 

बाहुपाशात निजलेलं प्रेम


अंगभर देहाचे लचके 

तोडणारं प्रेम

माणुसकीलाही ओरबाडून

खाणारं प्रेम


वेळेला काळाला न जुमानणारं प्रेम

खर्‍या चेहर्‍यांमागचं

खोटं प्रेम


वेगवान धावणारं 

गतिमान प्रेम

अर्धवट आयुष्याला पूर्णविराम देणारं खुळं प्रेम


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract