प्रेम रसात न्हाऊ दे
प्रेम रसात न्हाऊ दे
कविता मला लिहु दे
जीवनाचे भाव वाहु दे
कविता मला मांडू दे
प्रेमभाव तिच्यात सांडु दे
कविता मला गाऊ दे
तुझ्यावरचे प्रेम त्यात वाहु दे
कविता माझ गानं होऊ दे
भरल्या प्रेमाच दानं पाहु दे
कविता माझी नांदु दे
तिच्यात तुलाच बांधु दे
कविता बाग फुलु दे
तुझ्या झोपाळ्यावर झुलु दे
कविता मला पिंपळपान दे
तुझ्या प्रेमाच हिरवं रान दे
कविता मला हासु दे
तुझ्या आठवणीत बसु दे
कविता तुझा वारा येऊ दे
वाचतांना पापणी ओली होऊ दे
कविता काय त्याला पाहु दे
तुझ्या प्रेमात त्याला न्हाऊ दे
कविता आठवणीची नदी वाहु दे
विसाव्याला तुझे सागर बाहु दे
कविता तु लिहण्याचा छंद दे
माझ्या कवितेचा त्याला गंध दे