Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Durga Deshmukh

Romance

3  

Durga Deshmukh

Romance

पहिला गुलाब प्रेमाचा

पहिला गुलाब प्रेमाचा

1 min
3


हातात गुलाब घेऊन मी तुझीच वाट पहाते

आपल्या भावना जपल्यात मी त्यात वळणावर


तु हातात गुलाब घेऊन माझी वाट पहात थांबणारा

किती व्याकुळतेने ते झाड साक्ष देत होते त्या वळणावर


तु हळुच हातातील गुलाब माझ्या हातात देतांना

माझं हृदय क्षणभर थांबल होत त्या प्रेमाच्या वळणावर


तुझ्या हातातला गुलाब मला स्पर्श करण्याला खुणवत होता

मी ही हळुच हात पुढे करताना लाजेने झुकली मान त्या वळणावर 


तो माझ्याकडे पहात असताना हृदयाची मात्र धडधड वाढत गेली

त्याच्या नजरेची जादु बेधुंद करत होती माझ्या नजरेला त्या वळणावर 


दोघे ही एकमेकांना अनामिक ओढीने बेधुंद करत होते 

नजरेला नजर मिळवतांना किती नजरा झुकल्या त्या वळणावर 


त्याच्या गुलाबाचा स्पर्श मला हळुवारपणे कुरवाळत होता

त्याच मन ही फुलासारख नाजूक आहे हे सांगत होता त्या वळणावर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance