केसात घे माळुन आता
केसात घे माळुन आता
1 min
3
काया वसुंधरेची गेली जळुन आता
गरज वनराईची आली कळुन आता
जंगल सोडून प्राणी आले घरात आता
विध्वंस करून जाणार कुठे पळून आता
ऊन वारा पाऊस दिशा बदलती आता
राने सुकुन गेली पालवी गळून आता
कितीदा विचार केला झाडे लावु वनाची
एकच विचार कितीदा झाला दळून आता
बांधले किती इमले आकाशही हे ठेंगणे
वनराईने फुलवु मळा या सारे वळुन आता
पक्का विचार झाला एक झाड लावु
निसर्गाचा नियम सर्वानी एकजुटीने पाळु आता
सुंदर सजली भिजली ही धरतीची काया
गुलाब केवडा सुंगधी केसात घे माळुन आता