दुपारी
दुपारी
1 min
4
आठव भावनांचे का दाटतात दुपारी
डोळ्यात आसवे पुन्हा का साठतात दुपारी
शांत लाटा घेतात थोडी विश्रांती दुपारी
पाण्यात प्रतिबिंब तुझे का वाटतात दुपारी
सुस्त झाल्या बागा डोंगर पेंगुळलेले दुपारी
तहानलेल्या महिना मला का छळतात दुपारी
चालताना तुझ्या आठवणीत विरल्या सावल्या दुपारी
झाडांच्या सावलीत खारुताई का खेळतात दुपारी
तुझ्यात मन गुंतलेले रात्रंदिवस दुपारी
तुझे शब्द बेजार मला का करतात दुपारी
कुरणाच्या हिरवळीत ओल्या ऊनही हिरवे दुपारी
सुकलेले शेत वाट पावसाची का पाहतात दुपारी