चांदणी भाळली
चांदणी भाळली
रात्र वेडावली 'श्वास गंधाळली
प्रेमात भिजून! चांदणी भाळली
जवळ घे मला! धुंद होऊ सख्या
स्पर्श होता तुझा! साजणी लाजली
नजरेत नजर! हृदयात धडधड
तुझ्या येण्याची! किणकिण वाजली
भेट झाडाखाली! फुले रेंगाळली
झाड बहरले! फांदी जरा साजली
गीत गुणगुणले मी! ओठावर आज
तुझी माझी कहाणी! गावभर गाजली
रंगले प्रेमामध्ये! लेवुनिया प्रेमसाज
सुदबुद्ध हरले मी! कशी नशा पाजली
हातामध्ये हात! हृदयाचा घेतला ठोका
डोळ्यांमधली तुझ्या! भावना वाजली