तृणाची पाती
तृणाची पाती
1 min
4
तृणाची पाती इवली
दवाच्या प्रेमात भिजली
प्रीत सूर्याची त्या झेलून घेता
पानावर त्या हळूच निजली 1
गालावर त्या पडली खळी
फुलराणीची गंमत झाली
ऊनकोवळे टिपून घेता
पसरली ही चौफेर लाली 2
गाल गुलाबी ओठ गुलाबी
बाग गुलाबी दिसली
रंग रंग टिपून घेता
ओठावर त्या कळी हसली 3
भिर भिर भिर वाऱ्यासवे
गालावरच्या बटा हालती
रिमझिम धारा झेलून घेता
थेंब थेंब गालावर खेळती 4
सकाळची ही किमया न्यारी
मन तुझ्यात गुंतून झुलते
आठवण तुझी मनात येता
लख्ख प्रकाशात चांदणी खुलते 5