STORYMIRROR

Meena Kilawat

Romance

2  

Meena Kilawat

Romance

प्रेम गीत

प्रेम गीत

1 min
3.0K


ओज तुझ्या चेह-याचे

दिसे मजला स्मित हास्यात,

रुजलेल्या या प्रेमाला

अंतरात गेलो मी सजवित.

तुझ्या धगधगत्या ह्रदयाने

उगम होतो आहे प्रेमाचा,

शब्द न उच्चारता जुळलो

स्वप्न दिसे मज भविष्याचा.

प्रेमाची धुंदी भरली मनी

पाऊल वाटे विश्वासाचे,

मनी होती हुरहूरी दाटली

वाटे स्वप्न सुंदर भविष्याचे.

प्रेम या अडीच शब्दाचा

अर्थ कां न मज कळला, 

 याच एका सुरम्य शब्दाने

आयुष्य लागले पणाला.

प्रेम गाणे गाता-गाता

डाव मांडला भविष्याचा,

आला ना मजसी विचार

समोर दिसणाऱ्या चिखलाचा.

प्रेम सागरी माझे बुडाले

पर्वा न करता आप्तांची,

सर्वस्व केले मी अर्पण

तमा न बाळगता समाजाची.

नाकारलं जरी प्रेम त्याने

मी करीतच गेले,

गोड आठवणीचा अविट ठेवा

मनी सजवून ठेवतच आले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance