प्रदर्शन
प्रदर्शन
ज्येष्ठ पौर्णिमेला असतो
वडाचा पाहण्यासारखा "लूक" ;
पुढच्या सात जन्मासाठी
नवरोबा होतात " बुक" .
दरवर्षी पौर्णिमेला वडाभोवती
बायकांचा घोळका असतो ;
मनातून सांगावे, किती बायकांना
नवऱ्याचा पुळका असतो ?
पौर्णिमेच्या वडपूजेला सर्वत्र
बेगडेपणाची "पॉलिश" ;
साता जन्मासाठी तोच
नवरा मागणे हा प्रकारच "बालिश" .
कुणी ठेवतात तर कुणी
ठेवत नाही विश्वास ;
वड न पूजणाऱ्या बायकांचे
नवरे घेतात मोकळा श्वास .
नवऱ्यालाही आवडीनिवडी असतात
याचे बायकांना असावे भान ;
"मागणी तसा पुरवठ्याचे "
गाऊ नये वडाभोवती गान .
श्रद्धा किती अंधश्रद्धा किती
ह्या डोळसपणे पहाव्यात ;
नुसते प्रदर्शन होईल
अशा गोष्टी टाळाव्यात.
साता जन्माचे कनेक्शन
पाहून वडही थक्क आहे ;
आपल्या वैचारिक सबलतेने
त्यास मनातून दुःख आहे.
