पोपट
पोपट
चोच लाल,
रंग आकर्षक हिरवा
रानावनात ,फळांच्या बागेत
बसलेला दिसतो हा सुंदरसा
खातो हिरवी मिरची अन् पेरू
बोली गोड अन् आवाज मधुर
पोपट हा चतुर
बोलण्यासाठी सदैव असे आतुर
शिकवण दिल्यास काढतो
माणसाप्रमाणे हुबेहूब आवाज
नक्कल करण्यात असे सर्वात चलाख
सांगतो आपणास पोपट
बिकट परिस्थितीत ही स्वभाव असावा शांत
भाषा असावी गोड अन्
जोडावी माणसं 🙏😊
