STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Tragedy

4  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

पोहचेल का मी घरी???

पोहचेल का मी घरी???

1 min
59

वाट जीवघेणी पण चालायचा निर्धार आहे

हाती उरले काहीच नाही पण मनात निश्चय आहे

उन्हाचा गोळा माथ्यावर घेऊन

वणवण रस्ता पार करतो आहे

पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे


पोटातली आग थुंकी गिळत विझवत आहे

खांद्यावरच्या तान्हुल्याला बघून जीव तळमळतो आहे

दोन घास त्याला मागण्या कमवता हात आज पसरतो आहे

पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे


आजाराचा कहर, दुःखाचा डोंगर

डोळ्यांत अश्रूंची किनार घेऊन

 मैलोनमैल काटेरी वाट तुडवत आहे

केविलवाण्या बायकोच्या नजरेला

हातात हात घेऊन आधार देत आहे

माणुसकी आटलेल्या जगात

भेगाळलेल्या जखमा चिंध्यात बांधून हसतो आहे

पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे

        


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy