पन्नास जन्म
पन्नास जन्म
मी तुझा नवरा आणि तू माझी बायको
कितीही जरी तू म्हणालीस नको नको
येते पन्नास जन्म मी तुझा नवरा आणि तू माझी बायको
तुझे खूप उपकार फेडायचे आहेत आठवण करून देऊ नको
मी तुझा नवरा आणि तू माझी बायको
पुढच्या जन्मी माझी कटकट तुला नको
मी देवाकडे तुला मागतोय म्हणून ताप करून घेऊ नको
पन्नास जन्म हां हां म्हणता जातील काळजी करू नको
पन्नासच्या नंतरचे पन्नास तू माझा नवरा आणि मी तुझी बायको
उगाचच कोणावरही अन्याय नको
तसे तर आताही घरात नवर्याचा नवरा असते बायको
उगीचच पुरुष म्हणतो मी तुझा नवरा आणि तू माझी बायको
आता खरं तर नवरा नवरा नसून तो असतो बायको
उगीचच म्हणत असतो
मी तुझा नवरा आणि तू माझी बायको
