STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Inspirational Children

3  

Ganesh G Shivlad

Inspirational Children

पंखात बळ माझ्या

पंखात बळ माझ्या

1 min
245

पंखात बळ माझ्या भरलेस तू आई,

तूच माझा देव अन् तूच सर्व काही..!!ध्रु!!


शिकवलेस तू मजला घेण्या भरारी उंच उंच,

सांगितले तूच मजला जगी नसे कोणी उच निच,

तूच दिली जाण ठेवण्या पाय जमिनी आई..!

तूच माझा देव अन् तूच सर्व काही..!!१!!


वाढविले तू कुशीत अन् झाकलेस पदराखाली,

ना लागू दिलीस झळ मला तुझ्या छत्र छायेखाली,

राहिलीस तू उपाशी पण पाजलेस मज आई..!

तूच माझा देव अन् तूच सर्व काही..!!२!!


दिले ज्ञान साऱ्या जगीचे होऊनिया तू माझी गुरू,

बाबा गेल्यावरी तूच होऊनी बाप पुसलेस अश्रू,

तूच दिला जगण्यास आधार मजला आई..!

तूच माझा देव अन् तूच सर्व काही..!!३!!


फेडू पांग कसे आई तुजपुढे अजुन मी लहान,

कर्जातून कसे होऊ उतराई उपकार तुझे महान,

जन्म मिळावा सप्त जन्मी पोटी तुझेच आई..! 

तूच माझा देव अन् तूच सर्व काही..!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational