पंखात बळ माझ्या....
पंखात बळ माझ्या....
पंखात बळ माझ्या
जन्मतःच तू भरले,
तुझ्या मार्गदर्शनाने
मी आकाशी उडले...
पंखात बळ माझ्या
घेण्या ती भरारी,
तू शिकवली आई
जगण्याची ही वारी...
पंखात बळ माझ्या
ठासून तू असे भरले,
आत्मविश्वासाने जगाच्या
प्रांगणात मी उतरले....
पंखात बळ माझ्या
ज्ञान हेच बलस्थान,
काेणी चाेरू शकत नाही
तू दिलेले हे उगमस्थान...
