STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

पंगत

पंगत

1 min
544



पारापुढे बसली

जेवणाची पंगत.

पंगतीत येणार

वाढायची रंगत.

        पळसाच्या द्रोणाला

        भाताचे गोल आळे.

        वरणाचे पाणी ते

        द्रोणातून ओघळे.

वांग्याची भाजी नि

बूंदीचा गोड लाडू.

पाहुण्यांना सगळे

आग्रहानेच वाढू.

        बाया ,गडी,लेकरं

        म्हातारे-कोतारे.

        खुशीने जेवतील

        पंगतीमध्ये सारे.

बफेच्या जेवणाची

आहे फॅशन जरी.

पंगतीची मजाच

आहे लय भारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational