STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
248

आली आषाढी एकादशीचा

ले वाटे पंढरीची वारी

खांद्यावर विठूची पालखी

दिंडीपताका घेती नरनारी

पंढरीचा राणा हरीपांडुरंग

नाचू धरू फेर घालू रिंगण

कीर्तनकारांची झाली गर्दी

पंढरीचे भरूनी गेले अंगण

चंद्रभागेच्या या तीरावरती

वारकऱ्यांची ही मांदियाळी

कुणी वाजवती मृदंग वीणा

वाजवे कुणी हाताची टाळी

जाऊ पंढरीला करू दर्शना

कर कटेवरी उभा विठुराया

निवूनि गेलेत डोळे नि मन

अर्पुनी सर्वस्व आणि काया

वरदहस्त विठूरुक्माईचा

राहतो भक्तांच्या डोईवरी

भोळा देव दीनधनिकांचा

जाई धावूनी भक्तां घरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational