STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

पिंजरा

पिंजरा

1 min
167

आम्ही खूप सुधारक , वातावरणही आधुनिक 

सुशिक्षित सुसंस्कृत , विचारही प्रवाहिक  //1//


स्थळाची माहिती तर , वेगळी पठडीपेक्षा

आई बाबा खूष , पूर्ण होतील अपेक्षा   //2//


माप ओलांडून आले , तुझ्या प्रेमात भिजले

समर्पणी भारावले , अद्वैतात सुखावले  //3//


नव्याचे नऊ सरले , दिनक्रम सुरु झाले.

तुझे माझे नव्हतेच , व्यवहारही एक झाले.  //4//


कधीतरी कामासाठी , डेबिट कार्ड दिले.

त्यानंतर माझे कार्ड , आरामात तुझे झाले.   //5//


व्यवहार धूर्तपणे , तुझ्या हातात घेतले.

गोड बोलून साधले , मला नंतर उमजले.  //6//


हा अदृश्य गुलामगिरीचा, आधुनिक सोनेरी पिंजरा

ना स्वातंत्र्य ना सत्ता, फक्त कष्ट नि कष्ट करा.  //7//


म्हणायला मला तसे , काहीच कमी नाही.

पंख फडफडवूनही , खटका उघडत नाही.  //8//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract