फुलांचा राजा
फुलांचा राजा
रंग गंधांंचा राजा
मृदुल ,सुगंधित
काटे जरी फांदीला
राजा असे मस्तीत
रंग विविधता काय
वर्णावी मी शब्दांत
लाल गुलाबी पीत
खुले शुभ्र वर्णात
प्रिय पंडीतजींना
सुमन गुलाबाचे
मिळे स्थान हक्काचे
कोटावरी नित्याचे
प्रदर्शन भरता
गर्दी जनांची लोटे
रोपासाठी नोंदणी
करती अग्रहक्के
दिसता झाडावरी
झणी तोडू वाटते
परि काटे निर्मिले
योजक विधात्याने
काश्मिरचे गुलाब
साठवेना चक्षूत
उद्यान गुलाबांचे
माईना नयनांत