STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

2  

Prashant Shinde

Tragedy

पहिलं प्रेम....!

पहिलं प्रेम....!

1 min
3.2K




आठवत नाही वय मला

माझं किती होतं

तरी ही नक्की मला

काही तरी कळत होतं


मी अगदी लहान

जणू लांडया चड्डीचा अधिकारी

तरी नजर भिरभिरती

साडीच्या पहिल्या जरीवरी


ती आली घरी

की मला खूप बरं वाटायचं

तिच्या अंगा खांद्यावर

माझं बिऱ्हाड वसायचं


काळेभोर डोळे

कमनीय गौर बांधा

रूपाची खाणच ती जणू

वाजवायची मधुर वेणू


मंजुळ गोड कोकीळ आवाज

त्यात निर्मळ माधुर्य भरलेले

शुभ्र सुबक पंगतमोती सोबतीला

सदा गुलाबी लाल पाकळीतून हसतेले


लावण्याची रास ती

नित्य घरी शिगोषीग भरून यायची

माझी पहिली व्हीकेट नेहमी

पाहताच क्षणी पडायची


आजही कुशीतील सौख्य मला

ताजे तवाने आठवते

उभार वक्षस्थळांची लगट

त्या वेळेची अजूनही मज लाजवते


ती गेली आकस्मिक

मी खरेच पोरका झालो

त्या पहिल्या वहिल्या प्रेमाला

जन्मो जन्मीचा मुकलो.....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy