पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
हुरहुर सदा | माजते अंतरी ॥
आणि धाप उरी | प्रेमामधी ॥ १ ॥
सहवास तीचा | वाटे हवा हवा ॥
कटाक्ष टाकावा I नजरेचा ॥ २ ॥
नजरा नजर I भूक ना तहान ॥
हळुचं हसुन | ओठबंद ॥ ३ ॥
वहिनी वहिनी I मित्र चिडवती ॥
स्वप्न ही पडती | पहाटेची ॥ ४ ॥
लाल तो गुलाब I प्रतिक प्रेमाचे ॥
ताटवे तयांचे I मनोमनी ॥ ५ ॥
हीच ती अप्सरा l मनाच्या मनाची ॥
भीती सांगायची I प्रेमभावा ॥ ६ ॥
घेत असे भेट I होऊन अधिर ॥
कंपती अधर I बोलताना ॥ ७ ॥
तुझे माझे प्रेम | कबुल करशी ॥
वाट तरी कशी I पहावीच ॥ ८॥
प्रेम ही असते I सहज भावना ॥
ती मनोकामना | सर्वांचीच ॥ ९ ॥
पहिलं प्रेम ते | आपलेसे होते ॥
हातुन सुटते I कधी कसे ? ॥ १० ॥