पहिला पाऊस
पहिला पाऊस
मावळला जसा सूर्य, तश्या ओझरत होत्या झळा.
पहिल्या पावसाचा मार खाऊन, गालात हसतोय माझा मळा.
बरसल्या सरी मातीवरती, चोहू बाजू सुवास दरवळला.
पावसा नंतर हवेत, काय तो सुखद गारवा पसरला.
दवबिंदूंच्या मोत्यांनी, सजली सारी वनराई.
द्रुष्ट काढा वसुंधरेची, साऱ्या सृष्टीची ती आई.
पाखरे नाचती आनंदाने, नाही कसलीही भिती.
पुन्हा शेतचारा दाने, उगवन्यासाठी तयार आहे माती.
वाऱ्याशी बोलताना, हिरवळ ही डोलत आहे.
कळणार नाही ती भाषा, पण आवाज होत आहे.
हे सर्व समोर असताना, नाही दुसरी हाऊस.
काय काय अन् किती घेऊन आला, हा पहिला पाऊस.
