STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

पहाट

पहाट

1 min
296

काल हळूवार दाटले मेघ नभी

 हळूच पसरला गारवा

 पाऊस वारा अन् धुंद वारा 

बेभान झाला हा आसमांत सारा ....


 पहिला पाऊस श्रावणाची चाहूल देऊन गेला ,

 मातीला सुगंधित करून गेला 


 दवबिंदूत नहाली अंगणातली ती वाट  

पाना फुलांवर मोती...

अन् उजाडली एक नवीन पहाट...

  

पहाट झाली रानपाखरांनाही जाग पहाटेच आली 

पाहुनी लावण्य धरतीचे उजळल्या दिशा दाही


 नभी सूर्य चमकला, चीलमिल किरणांनी झाडे झळकली..

 पहाटेच्या गार वाऱ्याची झुळूक मनाला स्पर्शून गेली..

 

 कळी सारखे उमलुन फुलांसारख फुलत जावं,

सुख असो वा दुःख हे नेहमीच हसत राहावं,  

आपल्या जीवनाकडे नेहमी डोळेभरुन पाहावं

क्षणाक्षणाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावं..

रम्य पहाट ही आज मज जणू सांगून गेली...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract