STORYMIRROR

Dinesh Kamble

Inspirational

3  

Dinesh Kamble

Inspirational

पडती अक्षता डोईवरती.

पडती अक्षता डोईवरती.

1 min
926


*_पडती अक्षता डोईवरती_*

जेंव्हा पडती अक्षता डोईवरती

भोळ्या बापाच्या डोळ्यांत तरळले पाणी..

तों क्षणभर रमला आठवणीत तिच्या

म्हणे कालच तर खेळतबागडत होती अंगणी..


पाहिला तों सजलेला मांडव अंगणभर

त्या आईच काळीज सुपाएवढं झालं..

ती पुन्हा पुन्हा न्याहाळत होती लेकीला,अंगणाला

ज्या अंगणात लेकीचं बालपण गेलं..


धाकटा लाड़का तों भाऊ तिचा

पाहुण्यांची विचारपूस करतो घाई -घाई.

काल पर्यंत काळी म्हणून चिडवायचा तिला जो

आज म्हणतो सुंदर परी दिसते माझी ताई ..


तिची धाकटी ती बहिण मात्र

निराश दिसतं होती आता..

प्रश्न तिच्या मनाला , ताईविना कुणाला

सांगेल आता मनातल्या साऱ्या खबर-बाता..?


त्यात बालपणीच्या मैत्रिणींचा उडतो

मात्र एकच एक गलबला..

जी ती हळूच कानात पुटपुटली

तुला नवरा मिळाला भलाचांगला..


तिची मात्र होती द्विधा मनःस्थिती

सोडतांना ते घर ते अंगण..

अक्षता पडत होत्या डोईवर अन

स्मित देत होता सावळा साजन..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational