पावसाचे थेंब
पावसाचे थेंब
पावसाचे थेंब जमिनीवर अलगद कोसळतात तेव्हा ते मला माझ्या बालपणात घेऊन गेलेले असतात
तर त्या वयात येऊन गेलं माझं निरागस बालपण काही क्षण का होईना ते मला परत देतात
स्वप्नांच्या मागे धावताना पायांनी सोसलेल्या चटकन वर प्रेमाचे तुषार हळुवार बरसवतात
पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर आलगद जमीनीवर वर कोसळतात
पावसाचे थेंब कधी विसरायला लावतात कित्येक वर्ष मागे नेऊन उनाडपणे बागडायला लावतात
आयुष्याच्या मध्यावरून बालपणात तर कधी उमलत्या तारुण्यात नेतात
मनाच्या कप्प्यात खोलवर दडून ठेवलेल्या आठवणींना नव्याने जागवतात डोळे भरून टाकतात
कडाडणार्या विजा गडगडणारे ढग काळेकुट्ट आभाळ पाहून मग नकळत आईचा पदर शोधतात
पावसाचे थेंब डोक्यावरून केसांवरून ओघळून गालावर येतात
डोळ्यातल्या अश्रू मध्ये केव्हाच मिसळतात
साऱ्या दुःखाचे मूळ निरस आयुष्याची मरगळ झटकून हेच आहे मला पुन्हा नव्याने जगायला शिकून गेलेल्या असतात
पावसाचे थेंब जमीनीवर जेव्हा कोसळतात!
