पावसा...
पावसा...

1 min

47
व्याकुळली रे धरित्री
तरी फाटेना आभाळ;
पावसा, तू धारित्रीशी
का रे, तोडलीस नाळ?
पेरताना पाहुनिया
पळालास दूरदेशी!
तहानलेल्या धरणीची
तृषा भागवू मी कशी?
मेघांची नुसती गर्दी
नाही थेंब, नाही पाणी;
आशा-निराशेचा खेळ
सदा "बळी"च्या जीवनी
नभाकडे टक लागे
थिजले गा डोळे आता;
लपंडाव ऊन-पावसाचा
विव्हळली काळी माता
साथ तुझी हवी राजा
ओल उरी राहू दे रे;
नको दुष्काळाच्या झळा
धन-धान्य पिकू दे रे...