STORYMIRROR

Hanamant Padwal

Inspirational

3  

Hanamant Padwal

Inspirational

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
28.6K


बरसला आज धुंआधार

बरसला आज बेसुमार.॥

वाटपाहुनी थकलेले नयन

भरुनी आले आज काठोकाठ.

अंधारातुनी बाहेर आलो

दिसते पुढे हिरवी वाट.

मनाला फुटले नवकोंबारे

बेलगाम वारे अंगी संचारे

सैरभैर धावे सुसाट अन

वेडावूनी जाई, देखता संततधार.

बुजूनी गेल्या पाऊलखुणा

आशा पल्लवली पुन्हा.

कालचा काळ झाला जुना

ओथंबली मनसागरकिनार.

लीला तुझी आगळी

नाही कधी कळली

कोरडे घसे नि सुके ओठ

पाणी आज पिणार.

           

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational