STORYMIRROR

Hanamant Padwal

Others

4  

Hanamant Padwal

Others

शौर्य तुझे वंदितो.

शौर्य तुझे वंदितो.

1 min
463


अतूल तुझे धैर्य

अतूल तुझी गाथा

जगा समोर मांडितो

शौर्य तुझे वंदितो...

कधी सीमेवर जाणे

शौर्याचे तुझे गाणे

अंतरी मी जपितो

शौर्य तुझे वंदितो...

निश्चिंत आम्ही घरामध्ये

घोर ना डर आम्हा वाटते

तुझ्या ठायी भरोसा ठेवितो

शौर्य तुझे वंदितो....

कावा करुनी गनिम उभा

तया धूळ चारली जवा जवा

उर आमुचा स्फुरन पावतो..

शौर्य तुझे वंदितो....

देशसेवेचा तू अभियंता

घरा दाराची तुला न चिंता

रातदिन तुझी सेवा पाहतो

शौर्य तुझे वंदितो....

      


साहित्याला गुण द्या
लॉग इन