जीवन गाणे
जीवन गाणे
1 min
323
चालता चालता
एखादे गीत गुणगुणा
नका न्याहाळू
सुटलेल्या पाऊलखुणा...!!
कधी रुतला असेल काटा पायी
कधी दाटली असतील आसवे डोयी
वेदनेची कळ काळजात
साठलेली मळभ मनात
सोडून सारे आता,
चला नव्याने मार्ग पुन्हा....!!
जाणिवेच्या वेदनेने
हृदय का कापते...?
असत्याच्या मोजपट्टीत
जग पैशात मापते
दुष्टांच्या बाजारात
व्यवहार हा होणार आहे
निभवा तेही सारे ठेऊनी कणखर बाणा..!!
वादळाचा जोर पुन्हा
ओसरणार आहे
वावटळीचे भय पाचोळ्यास आहे
भय गाडून पाहा त्या तिथे
क्षितिजावरचे रंग खुणावतात तेव्हा
ठेवा निर्धार नि कणखर कणा...!!
