STORYMIRROR

Hanamant Padwal

Tragedy

3  

Hanamant Padwal

Tragedy

वाट पाहतोय....

वाट पाहतोय....

1 min
357

उजाड माळरानावर

उभे एकाकी रुक्ष झाड...

कालच्या हिरव्या रानी

पाण्याविना करपे काड...||

नद्या ओढे दुथडी वाहत

धुवाधार पाऊस,झाली कथा...

भग्नावशेष दाखवी विहिरी

वास्तव आणि आजची व्यथा...||

जलबिंदूसाठी तरसे चोच

तशीच जितराबाची कहानी...

मोकळ्या आभाळात विरली

चातकाची हाक नि कोकीळ गाणी...||

भार पेलते बोडके झाड

पानाविन उघड्या फांदीचा...

आशा धरुनी घरटे सजले

आधार घेऊन काटक्यांचा...||

खोल डोळ्यातले आटले पाणी

काळ्या रानातल्या भेगा बघुनी

तग धरुन आहे घशाची कोरड

मधूनच येणाऱ्या मेघाकडं बघुनी...||

             


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy