म्हणून काय झाले..?
म्हणून काय झाले..?
1 min
214
नसेल जरा गोरी,
म्हणूनी काय झाले
गोऱ्या गोऱ्या चेहऱ्यानी
तुला भूलविले...
गोऱ्या गोऱ्या कांतीचा
नखरा रं न्यारा,
न्याळूनीया बघ जरा
सावळा चेहरा.....
तयामधी साजिरे रुप की लपले...
टपोर डोळ्यामधी
पाणीदार बाहुल्या
रेखीव नाकाखाली
ओठाच्यां पाकळ्या....
सोडूनिया सारे ,मन कुठे रेंगाळे.....
गुणाची तिजोरी
बघ जरा खोलूनी
जाऊ नकोस तू
वर अंगा भुलूनी....
दारी तुझ्या ऐैश्वर्य,उभे बघ ठाकले.....
