बंधन
बंधन
1 min
354
बेटीनेच बांधली राखी मला
मनी नात्याचा योग साधला
मला बहिण नाही...
तिला तरी कुठं भाऊ आहे..
हा सारा तिने दुवा सांधला....!! बेटीनेच....
छोटी म्हणाली,'ताई ,माझा भाई'
अन मी ही म्हणालो तिला ताई...
नाते तयार झाले या सणाला..!!बेटीनेच....
धाग्याची दोन टोके जुळवूनी
बंध गेले आपसुक गुंफूनी
वलय लाभले आज रक्षाबंधनाला..!!बेटीनेच...
खंत ना कमी वाटली तिला
तिच्या भावनेतला ओलावा
मला भावला या क्षणाला...!! बेटीनेच...
उजळे चेहरा नि दाटे उमाळा
तेवते निरंजन मनी कळा
नेत्र बाहुल्या त्या तोच प्रकाश मला..!! बेटीनेच..
