मनमोहिनी
मनमोहिनी
ऋतू वर्षाच्या काळोख राती
नभी दाटले काळे मेघ...
चमकून गेली विद्युलता
नजरेत भरली शुभ्र रेघ...
तशीच भासली मजला तू
लखलखणारी दामिनी...
ह्रदयावरती घाव देऊनी
गेलीस कुठे मनमोहिनी...
झुळझुळ वारा जरा बावरा
दरवळ सोडी रानोरानी...
बेधुंद पाखरे,गंध घेऊनी
पक्षी गाती मंजुळ गाणी...
चहुबाजूंनी चाहूल जागते
येते परी की येते राणी....
दिस उजडे रात जागुनी
तुझ्या कैफेत मी मनमोहिनी....
