पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
253
गडाडलं आभाळ नि
बरसलं पाणी....
पाण्यामधी भिजली
टंच तुझी जवानी....
लाही लाही शमली
जमीन होती तापली
मनामधी बघ कशी
पुन्हा आग पेटली....
गोड गाते कोकिळा
प्रितीचं गं गाणं..
पाणी पिवून बघ
कसं तरारलं रानं....
चौफेर दरवळे
मातीचा गं गंध...
बरसल्या सरी अन्
वारा वाहे मंंद....
पहिल्या गं प्रितीचा
पहिला हा पाऊस
गुंतला जीवामधी जीव
नि फिटली गं हौस ...
