राजा माझा, तुमचा, आमचा
राजा माझा, तुमचा, आमचा
युगानंतर युगे युगे
आठवेल तुला राष्ट्र
सह्यगिरी सांगेल कथा
आणि मुजरा करेल महाराष्ट्र....||
न्याय नितीचा धडा मिळाला
जिजाऊंच्या संस्कारातुनी...
स्वराज्य स्वप्न मनी बांधले
सळसळ नसा नसामधुनी...||
स्वराज्य संकल्पना पित्याची
सत्यात उतरवण्या तुला...
प्रेरणा जिजाऊंची सदैव
लाभली राजा तुला...||
इशाऱ्यावर जीव देणारे
लाभले मराठमावळे तुला...
तवाच कुठं रयतेने इथल्या
स्वराज्य सूर्य पाहिला...||
पुण्यप्रतापी शिवछत्रपती
पावन झाली इथली माती
गीत महतीचे खडकामधुनी
गाती कालची गवतपाती....||
धैर्य तुझे शौर्य तुझे कावा तुझा
वंद्य वंद्य छावा तुझा....
नीतीन्यायाचा आदर्श तू
अन् कणाकणाचा हर्ष तू....||
नर नारी वा असो कृषक
तूच तयाचा वाली नि रक्षक
तुझ्या भरोसी भाग्य उजळले
तुज देखता जीवन कळले...||
जातीपातीचा न बोलबाला
स्वामीनिष्ठ देशभक्त मावळा
तू असणे जीवापरी प्यारे
दरबारी तुझ्या कैक मोहरे...||
गनिमास न कळे तुझी निती
तव उमगली ना रयतनाती
बाजी जीवाची लावी बाजीप्रभू
ताना लढला वंदूनी शिवप्रभू...||
ऱ्हदयाठायी तुझे वसणे राजा
रोज अंतरी तुझी बांदतो पूजा
देव नाही परी दैवत माझे
मनमंदिरी असणे साजे..||
