STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action

3  

Sarika Jinturkar

Action

पाऊस

पाऊस

1 min
214

अचानक आज मेघ

दाटून येता अंबरी 

तांबूस पिवळ्या किरणांमधूनी 

रिमझिम बरसल्या सरी  


इंद्रधनुचे तोरण सजले 

गर्जणार्‍या नभावरी  


मुक्त विहार करी पाखरे

 हसऱ्या साजऱ्या वृक्षावरी 

 थुई थुई नाचे मोर फुलून 

 पिसारा भरजरी  


तप्त धरणीवर बरसे हा स्वच्छंद  

मृदगंध दरवळता मातीचा होई विलक्षण आनंद 

तृष्णा शमवी सृष्टीची 

पाऊस तोच पण 

प्रत्येक वेळी वाटे नवीन  


पावसाच्या रिमझिम सरीत अलगद भिजावे

कधीतरी स्वतःसाठी जगावे 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात 

नवीन अनुभव घेऊन 

ते क्षण अविस्मरणीय करावे 

या बरसणाऱ्या पावसात💦💦☔☔💦💦


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action