पाऊस तो अन् ती
पाऊस तो अन् ती
त्यांचा जिवलग सखा
पाऊस कोसळणारा
वर्षाव हो अंगावरी
झणीच सुखावणारा
अवचित कुठुनसा
येतो तांडव करीत
चिंब भिजवी दोघांना
झिम्माडशा लहरीत
अगदी मनमुराद
तो अन् ती भिजतात
ओल्याशार गारव्यात
मिठीत सामावतात
धुंद ओल्या संधीकाली
येई प्रीत उमलूनी
हसतो नभात गाली
बेभान प्रीत बघूनी
