पाऊस पहिल्या प्रेमाचा
पाऊस पहिल्या प्रेमाचा
मेघ दाटून आलेले
होता जूनचा प्रवास
आला पाऊस पहिला
झाला आनंद मनास.
तिला बघीतले आज
भिजताना पावसात
होती जणू आनंदात
बळी मी गेलो प्रेमात.
तिचे निनांद तेजस्वी
रूप आवडले मला
एक टक न्याहाळत
बसलोय जणू तिला.
तिला आवडे पाऊस
मला ती त्या पावसात
बघताच बळी गेलो
माझ्या पहिल्या प्रेमात.
नाही विसरता येत
क्षण पहिल्या प्रेमाचे
त्याच क्षणाला मला
भाव कळले मनाचे.
आले पहिले पाऊस
जणू प्रेमच घेऊन
गेले जेव्हा परतून
आले हृदय भरून.